गुहागर l प्रतिनिधी :अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चिपळूण आणि श्री सत्यनारायण सन्मित्र सेवा मंडळ मळण कुंभारवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने . संस्थापक कै. गोपाळशेठ साळवी यांच्या सातव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि सन 2025 या नविन वर्षाची दिनदर्शिका प्रकाशन सोहळा अशा कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले होते.
अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चिपळूण यांच्या माध्यमातून गावातील 98 रुग्णांची मोफत तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून त्यांचे वजन मधुमेह, रक्तदाब, कॅल्शियम, इसीजी, ऑक्सीजन लेवल प्राथमिक स्वरूपाच्या तपासण्या, आहाराबद्दल मार्गदर्शन आणि मोफत औषधउपचार देण्यात आले. उपरोक्त मंडळातील जेष्ठ महिला आणि पुरुषांना स्वेटरचे वाटप करण्यात आले. त्याच प्रमाणे जि. प.केंद्र शाळा मळण या शाळेला मंडळाच्यावतीने नोटीस बोर्ड भेट म्हणून मुख्यध्यापक श्री पागडे गुरुजी यांजकडे सुपूर्द करण्यात आला.
सदर आरोग्य शिबिराला डॉ. रजनीश रेडीज डॉ. रोहिणी शिंदे
कॉर्डिंनेटर संध्या साळुंखे मॅडम आणि सचिन पोकळे सर आणि सहकारी स्टाफ यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्याचप्रमाणे दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याला माजी मुख्याध्यापक श्री रविंद्र इंदुलकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तसेच श्री पागडे गुरुजी, तटामुक्ती अध्यक्ष श्री निलेश धामणस्कर, श्री रामचंद्र तांबे, दयानंद जाधव, मदन जाधव, अंगणवाडी शिक्षिका सौ. जाधव आणि सौ पूनम साळवी आदर्श महिला मंडळ अध्यक्षा सौ. वर्षा साळवी, आशा सेविका सौ. अश्वीनी सोलकर, शुभ्रा जाधव
मंडळाचे सल्लागार मोहन तांबे, अशोक साळवी, अध्यक्ष विलास साळवी, उपाध्यक्ष किशोर साळवी, चंद्रकांत साळवी, विजय साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव प्रमोद साळवी यांनी केले.
अपरांत हॉस्पिटल च्या वतीने सदर आरोग्य तपासणी शिबीर मोफत केल्याबद्दल मंडळाच्या वतीने आभार मानले.












