तिडे आदिवासीवाडी शाळेने प्रभागस्तरीय स्पर्धेत मिळविले भरघोस यश

मंडणगड /प्रतिनिधी : जिल्हा परिषद रत्नागिरी ,पंचायत समिती मंडणगड पुरस्कृत कुंबळे प्रभागस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा न्यू इंग्लिश स्कुल,पालवणी येथे पार पडल्या.सदर स्पर्धेत जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तिडे आदिवासी वाडी या शाळेतील विद्यार्थ्यांनी वैयक्तिक आठ खेळात अत्युकृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजय मिळविला तसेच सांघिक खेळातही आपली बाजी पणाला लावत तिडे केंद्राला चॅम्पियन ट्रॉफी मिळविण्यासाठी हातभार लावला.तसेच शाळेतील अनेक विद्यार्थ्यांची तालुका स्तरावर खेळण्यासाठी निवड झाली आहे.सदर विध्यार्थ्यांना केंद्रप्रमुख श्री.जगताप सर,केंद्रातील सर्व शिक्षक,मुख्याध्यापक श्री.निलेश लोखंडे व सहकारी शिक्षक श्री.प्रकाश पवार यांचे मार्गदर्शन लाभले.व सर्व यशस्वी विध्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व तालुकास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.