खेड(प्रतिनिधी) येथील जेसी आय खेड आयोजित २२ वा जेसी फेस्टिवल चे आयोजन महाड नाका येथे आयोजित करण्यात आला असून जेसी फेस्टिवलची सुरवात जेसी कारनिवलने करण्यात येणार आहे .
या फेस्टिव्हलचे उद्घाटन गृहराज्यमंत्री नामदार . योगेशदादा कदम यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत . वेगवेगळे स्टॉल , खाद्यनगरी , आनंदमेळा, सांस्कृतिक कार्यक्रम , दांडिया नाईट, खेळ पैठणीचा , परदेशी कलाकार यांचे चित्तथरारक अनुभव कलेचे सादरीकरण, अभिनेत्री यांची फेस्टिवल मधे उपस्थिती , लावणी , असे वेगवेगळे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत . त्याचं बरोबर गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना सायकल वाटप , गरजू महिलांना शिलाई मशीन , घरघटी यांचे वाटप उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे .
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यक्रम प्रमुख जेसी प्रमोद कांबळे , अध्यक्ष जेसी अमर दळवी व जेसी आय खेड चे सर्व सभासद प्रयत्न करत आहेत .










