मंत्री नामदार नितेश राणे यांनी घेतले रासाई देवीचे दर्शन
वैभववाडी | प्रतिनिधी : माहेरवासिनींचे श्रद्धास्थान असलेल्या अचिर्णे येथील रासाई देवीच्या यात्रेनिमित्त मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. देवस्थान कमिटीच्या वतीने कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल ना. नितेश राणे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा बँक संचालक व आचिर्णे गावचे सुपुत्र श्री.दिलीप रावराणे, वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, भाजप पदाधिकारी नासीर काझी, बंड्या मांजरेकर, उद्योजक गिरीधर रावराणे, माजी सरपंच जयसिंग रावराणे, सरपंच रुपेश रावराणे, माजी उपसरपंच सुशील रावराणे, उत्तम सुतार, वासुदेव रावराणे, सिद्धेश रावराणे, सुनील रावराणे, बंटी रावराणे, रितेश मेस्त्री व पदाधिकारी, भाविक उपस्थित होते.











