तळवली | वार्ताहर : जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थान श्रीक्षेत्र नाणीजधाम च्या अंतर्गत भक्त सेवा मंडळ गुहागर च्या वतीने काल 12 जानेवारी रोजी पालशेत हायस्कुल येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले या सेवाभावी कार्यात 70 जणांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाला मा. जि. प. सदस्य श्री. प्रशांत शिरगांवकर, पालशेत गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री. नाना पालकर, महेश तोडणकर, बंटी नार्वेकर, मिनार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या सेवा कामी संप्रदायचे गुहागर तालुका सेवाध्यक्ष सौ. धनश्री मांजरेकर व त्यांची तालुक्यातील टीम यांनी मेहनत घेतली.
जगद्गुरू नरेंद्रचार्य महाराज संस्थान श्रीक्षेत्र नाणीजधाम च्या अंतर्गत 4 जानेवारी ते 19 जानेवारी या कालावधीत महारक्तदान संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे 1200 रक्तदान शिबीरे आयोजित केली आहेत. 1 लाख रक्तकुपिका संकलित करण्याचा संकल्प आहे. या शिबिरांतून संकलित होणारे रक्त… ब्लड कँसर ग्रस्त, किडनी फेल्युअर पेशंट, थळेसिमिया, शिकाळसेस, इत्यादी गरजू रुग्णांना देण्यात येत आहे.या संस्थाना मार्फत गेल्या 9 दिवसात आतापर्यंत सुमारे 88 हजार रक्त बाटल्या संकलित करून महाराष्ट्र शासनाकडे सुपूर्त करण्यात आल्या आहेत.








