जयगड येथील संदीप मेस्त्री यांचा “चंद्रयान 3” देखावा प्रथम
स्पर्धेला तालुकाभरातून उदंड प्रतिसाद


रत्नागिरी :- रत्नागिरीतील प्रसिद्ध फोटो स्टुडिओ “कांचन डिजिटल”तर्फे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही “घरगुती गणपती सजावट स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला गणेशभक्तांचा यंदा उदंड प्रतिसाद मिळला. तालुकाभरातील 110 या स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवला. जाणकार परीक्षकांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. यंदा वैविध्यपूर्ण ऐतिहासिक, पौराणिक, वैज्ञानिक सामाजिक देखावे, तसेच आकर्षक आरास थक्क करणारी होती. परीक्षकांना निकाल लावणे कठीण गेले. गणेशभक्तांचा उत्साह आणि गणेशाप्रति अपार श्रध्दा यातून दिसून आली. या स्पर्धेचा निकाल आज जाहीर करण्यास आम्हाला आनंद होत असल्याचे आयोजक कांचन मालगुंडकर यांनी म्हटले आहे.
या स्पर्धेला प्रायोजक म्हणून रत्नागिरीचे प्रसिद्ध उद्योजक भैय्याशेठ तथा किरणशेठ सामंत यांच्यासह उद्योजक मुकेश गुंदेजा, प्रवीण जैन, राजू कीर, प्रसन्न आंबुलकर, कै. उमेश शेटे, गणेश भिंगार्डे, राजू घाग, दिलीप संघवीज, सुमित जैन, राजा शेठ मयेकर, भूपेश मोरे, विजय खेडेकर, वैभवी खेडेकर, दिलीप भाटकर यांनी प्रायोजकत्व दिले.
स्पर्धेचे परीक्षण परीक्षक अभिजीत नांदगावकर, नरेंद्र जगन्नाथ पाटील, विजय पाडावे, विजय बासुतकर, अमृता मायनाक, शकील गव्हाणकर, अजिंक्य सनगरे, आदेश मयेकर आणि कांचन मालगुंडकर यांनी तालुकाभर फिरून केले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :-
□ *प्रथम क्रमांक ( रु. 12000/-, ट्रॉफी व फोटो फ्रेम) -* संदीप मेस्त्री – सडेवाडी, जयगड ( देखावा -चंद्रयान 3 )
□ *द्वितीय क्रमांक – (रु. 8000/- , ट्रॉफी व फोटो फ्रेम) -* चारुदत्त धावलकर- ब्राह्मणवाडी गावखडी, देखावा – मार्कंडेय )
□ *तृतीय क्रमांक ( रु. 5000/- व ट्रॉफी व फोटो फ्रेम )-* अनंत साळवी- फणसोप ( देखावा – दशावतार )
■ *विशेष उल्लेखनीय (प्रत्येकी 2000 रु. ट्रॉफी व प्रमाणपत्र)*
◇ अनिल गोताड- (कोतवडे , गावणवाडी : देखावा- संत गोरोबा),
◇ अनिकेत सुपल (सह्याद्री नगर- नाचणे : देखावा – चंद्रयान),
◇ आशिष वाडकर ( मिरजोळे, देखावा- जेजुरी),
◇ मयूर भितळे ( सोमेश्वर, देखावा- समाजसेविका सिंधुताई सकपाळ)
■ *उत्तेजनार्थ ( प्रत्येकी रु. 500 व ट्रॉफी व प्रमाणपत्र) :-*
रमेश माचकर (सुतारवाडी शिरगाव, देखावा- गोवर्धन), श्रीपाद शिवलकर (बसणी-नागझरेवाडी, देखावा-सामाजिक संदेश), घाटक कुटुंबीय ( शेंडगेवाडी, पावस, देखावा- चंद्रयान)
■ *प्रोत्साहन पर (आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्र):-*
संतोष नेवरेकर (बसणी, देखावा- कालिया मर्दन),
अर्जुन माचिवले (तरळ-माचीवलेवाडी, देखावा- वाचाल तर वाचाल), मंगेश घाणेकर (घाणेकर वाडी-नरबे, देखावा -जंगल), जीवन कोळवणकर ( उत्कर्ष नगर- कुवारबाव, देखावा- वराह अवतार), संजय वर्तक ( कुवारबाव, देखावा- देशभक्तीपर), सागर कुंभार (कुंभारवाडी, पावस, देखावा- निसर्ग देखावा), अजित साळवी (जुईवाडी, फणसोप, देखावा- कोळी गणपती), सागर चौगुले (काळबादेवी, देखावा- हिमालय), साईराज वाडकर (मिरजोळे, देखावा- राधाकृष्ण), रामदास झापडेकर ( कर्ला, देखावा-
परशुराम भूमी वटपौर्णिमा ),
राजेंद्र खानविलकर ( रत्नागिरी, देखावा- कलाकुसर), साहिल शिवलकर (रत्नागिरी, देखावा- कलाकुसर), अवधूत सावंत (रत्नागिरी, देखावा- मोबाईलचे दुष्परिणाम), साईराज पोटफोडे, (रत्नागिरी, देखावा- नैसर्गिक), सचिन बेर्डे ( रत्नागिरी, देखवा- वारली पेंटिंग).
■ *30 सप्टेंबर रोजी पारितोषिक वितरण*
शनिवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी ठीक 4 वा. श्री भैरव मंगल कार्यालयात दिमाखदार पारितोषिक वितरण सोहळा पार पडणार आहे. दिग्गज मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. यावेळी रत्नागिरीतील पाच निवडक मंडळांचे मंगळागौर सादरीकरण होणार आहे. तरी कार्यक्रमाला गणेशभक्तांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक कांचन मालगुंडकर यांनी केले आहे.










