स्थानिक ग्रामस्थांचा इशारा : तहसीलदारांना निवेदन
सावंतवाडी । प्रतिनिधी : धाकोरा बांदिवडेवाडीतील होळीचा भाटला ते मुळीक यांचे घरापर्यंतचा रस्ता ग्रामपंचायत २३ नंबरी दप्तरी नोंद आहे. सदरचा रस्ता सुमारे १५ वर्षांपासून अतिशय खराब झालेला असून दोन वेळा निधी मंजूर होऊ नये त्यावर खर्च घालता आला नाही त्यामुळे या रस्त्या संदर्भात असलेला वाद मिटवून त्वरित आहार असतात डांबरीकरण मिळावा अशी मागणी आत्माराम नारायण साटेलकर यांनी केली आहे. तसेच याबाबत त्वरित कार्यवाही न झाल्यास प्रजासत्ताक दिनी उपोषण सोडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
याबाबतचे निवेदन त्यांनी तहसीलदार सावंतवाडी यांना सादर केले असून या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सदरचा रस्ता सुमारे ७ फुट रुंदीचा आहे. सद्यस्थितीत रस्त्याच्या दोन्ही बाजुला अतिक्रमण करण्यात आलेले आहे. रस्ता दुरुस्त करताना त्यावेळी जागेवर अतिक्रमण होत असल्यामुळे व नाहक वादविवाद होत असल्यामुळे सदरचा रस्ता दुरुस्त करण्यासाठी शासनाकडून दोनवेळा निधी येवून परतून गेला आहे.
परंतु सदरच्या रस्त्यावर दोन्ही बाजुला अतिक्रमण करण्यात आल्याने संबंधित व्यक्ती सदरचा रस्ता दुरुस्त करण्यासाठी आडकाठी करीत आहेत. त्यामुळे सदरचा रस्ता खराब झाल्यामुळे आजारी व्यक्ती, गरोदर महिला यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
तरी आमचा बादिवडेवाडीतील होळीचा भाटला ते मुळीक यांचे घरापर्यंतचा रस्ता दोन्ही बाजुला झालेले अतिक्रमण हटवून पोलीस संरक्षण घेवून दुरुस्त करुन मिळावा अन्यथा आम्हांला न्याय मिळण्यासाठी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी उपोषण छेडावे लागेल, असा इशारा आत्माराम साटेलकर त्यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे.











