जिल्हा नियोजन समितीची रविवारी बैठक

 

रत्नागिरी : जिल्हा नियोजन समितीची बैठक राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे जिल्हा नियोजन अधिकारी सुचित वंजारे यांनी कळविले आहे.