दापोली होमगार्ड पथकाने हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत भव्य वृक्षारोपण

दापोली (विशेष प्रतिनिधी) – राज्य शासनाच्या “हरित महाराष्ट्र – समृद्ध महाराष्ट्र” या महत्वाकांक्षी योजनेच्या अंतर्गत दापोली होमगार्ड पथकाने २१ सप्टेंबर २०२५ रोजी कार्यालय आवारात भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला. या उपक्रमाचे मार्गदर्शन पथक समादेशक अधिकारी राजेश राजवाडकर यांनी केले. या कार्यक्रमात पथकातील तब्बल ३६ होमगार्ड जवान उत्साहाने सहभागी झाले.
कार्यक्रमाची सुरुवात होमगार्ड तेजस भारदे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित जवानांनी एकत्रितपणे विविध प्रकारची झाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. या उपक्रमातून परिसरात हिरवाई वाढेल आणि “हरित महाराष्ट्र – समृद्ध महाराष्ट्र” या संकल्पनेला प्रत्यक्ष रूप मिळेल, असे अधिकारी आणि उपस्थितांनी अभिमानाने व्यक्त केले.