मराठी आठव दिवस कार्यक्रम उत्साहात !!

लोकप्रिय कवीची उपस्थिती

दोडामार्ग | प्रतिंनिधी : मराठी साहित्यसृष्टीतील काही ताऱ्यांनी आज नूतन विद्यालय कळणे प्रशालेत काव्यमैफिल सजवली.’ मराठी आठव दिवस ‘ या कार्यक्रमात आपल्या नम्रविनोदी वा शैलीच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्नांवर भाष्य करत उपरोधाचा आसूड ओढणारे ज्येष्ठ हास्य कवी अशोक नायगावकर यांनी आपल्या खुमासदार शैलीत मानवी जीवनाशी संबंधित विविध प्रश्नांवर मिशिकलतेने भाष्य करत आपल्या कविता सादर केल्या. त्यांनी ‘ वांग ‘ ही कविता सादर करून रसिकांची विशेष दाद मिळवली.

 

सुप्रसिद्ध सामना चित्रपटाचे दिग्दर्शक , विडंबन कवी , वात्र टीकाकार , चित्रपट दिग्दर्शक रामदास फुटाणे यांनी सामाजिक प्रश्नांवर भाष्य करत, गोरगरीब व खेडूत लोकांच्या मनात सरणारे दुःख आपल्या कवितेच्या माध्यमातून रसिकांसमोर मांडले. गीतकार कवी अशोक बागवे यांनी आपल्या गीतांचे गायन करून रसिकांची दाद मिळवली.’ चार दिवस सासूचे ‘ या आपल्या मालिका गीताची निर्मितीची कहाणी उलगडून दाखवली . यावेळी इंद्रनील घुले या कवींनी ‘ लग्नातील जेवण ‘ ही प्रेमावरची भन्नाट कविता सादर करून रसिकांची दाद मिळवली.

 

ही काव्यामैफिल ऐकण्यासाठी दोडामार्ग तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर , पत्रकार आदी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राच्या या लोकप्रिय कवींचा संस्थेचे सचिव मश्री. गणपत देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक उमेश देसाई यांनी तर सूत्रसंचालन शिक्षक सतीश धर्णे तर आभार निकिता सावंत यांनी मानले