सुदैवाने जीवितहानी टळली
वैभववाडी | प्रतिनिधी
भुईबावडा घाटात ट्रक आणि कार यांच्यात अपघात झाला. यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.गगनबावडा वरून वैभववाडी कडे ऊस वाहून नेण्यासाठी ट्रक येत होता. तर भुईबावड्यापासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर चार चाकी कार मालक आपल्या ताब्यातील गाडी घेऊन कोल्हापूर कडे जात असताना भुईबावडा घाटात दोन्ही वाहनांमध्ये जोरदार टक्कर होऊन अपघात झाला. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे.
अपघात झाल्याने घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वैभववाडी पोलिसांना घटनेची माहिती समजतात पोलीस कॉन्स्टेबल हरिश्चंद्र जायभाय आणि मोहन राणे यांनी धाव घेत घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली. दरम्यान दोन्ही वाहन चालकांनी हे प्रकरण आपापसात मिटविल्याने वैभववाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही.तर याच मार्गावर भुईबावडा बाजारपेठेत उसाचा ट्रक बंद पडल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. मात्र ती ही सुरळीत करण्यात आली आहे












