Weather Update: Pune, Mumbai temperature will rise further, how will the state be?
तर, दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. आठवडाभरापासून पुण्यासह राज्यभरातच उन्हाची तीव्रता वाढत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 41 अंशांच्या वर आहे. तर हे तापमान 45 पर्यंत पोहोचेल असं सांगितलं जात आहे.
तापमानाने चाळीशी ओलांडली आहे. तर, विदर्भ आणि खान्देशात अनेक ठिकाणी तापमान 44 अशांवर गेलं आहे. सूर्य आग ओकत असल्याने यंदाचा उन्हाळा तापदायक ठरत आहे. अशात नागरिक या उकाड्यापासून सुटका कधी होणार आणि मान्सून कधी येणार, याची वाट पाहात आहेत.
मात्र, यंदा मान्सूनही लांबणीवर पडणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने 4 जून रोजी पाऊस केरळमध्ये पोहोचेल, असा अंदाज वर्तविला आहे. तर ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने 7 जूनची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे जून महिन्याच्या मध्यापर्यंत देशाच्या बहुतांश भागांमध्ये उष्णता कायम राहण्याचा अंदाज आहे.












