Four vehicle accident at Dabhole; Traffic was disrupted
पाली | वार्ताहर रत्नागिरी-कोल्हापूर : महामार्गावरील दाभोळे बाजारपेठेतील पुलावर आज गुरूवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या दरम्यान चार वाहनांचा अपघात घडला आहे. या अपघातामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूकडील वाहतूक बराचवेळ खोळंबली होती.
गँस टँकर, ट्रक, कार व मोटारसायकल या चार वाहनांचा अपघात घडला. यामध्ये या वाहनांचे नुकसान झाले आहे. अपघातग्रस्त वाहने पुलावरच उभी असल्याने दोन्ही बाजूने वाहतुकीची कोंडी झाली. यावेळी महामार्ग मृत्युंजय दूत ग्रुप दाभोळेचे प्रतिनिधी काका हिरवे, दीपक कांबळे, अजिंक्य दाभोळकर आणि महामार्ग पोलीस मदत केंद्र हातखंबाचे कर्मचारी यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीचे नियमन केले व वाहतुकीची कोंडी दूर केली.












