मालवण पोलिसांची परप्रांतियां विरोधात धडक मोहीम

36 जणांच्या आधारकार्डची सत्यता पडताळणी होणार

मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची माहिती

मालवण | प्रतिनिधी : मालवण पोलिसांनी परप्रांतियां विरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. 36 परप्रांतीयांची आधारकार्ड सत्यता पडताळणीसाठी मुंबई येथील वरिष्ठ कार्यालयात आली आहेत. अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली.

मालवण पोलीस ठाणे हद्दीतील परप्रांतीय कामगार, व्यवसायिक यां सर्वांची आधारकार्ड सत्यता पडताळणी होणार आहे. तसेच अन्य जिल्ह्यातून अथवा परराज्यातून येणारे फेरीविक्रेते, व्यवसायिक, कामगार यांचीही चौकशी माहिती मिळाल्यानंतर तात्काळ होणार आहे.

तरी स्थानिक नागरिकांना आवाहन करण्यात येते की अश्या प्रकारे संशयित व्यक्ती आढळून आल्यास मालवण पोलीस ठाण्याची संपर्क करावा. स्वतः कुठल्याही प्रकारचा कायदा हातात घेऊ नये. असे प्रकार आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी आवाहन करताना सांगितले.