रत्नागिरी : रविवार दिनांक २ मार्च रोजी श्रीराम मंदिराचा १४ वा वर्धापनदिन साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.कार्यक्रम – सकाळी ८ वाजता पूजा, अभिषेक.त्यानंतर ८.३० वा.श्री सत्यनारायणाची पूजा,आरती होईल.दुपारी १२ वाजल्यापासून दिवसभर नामवंत भजन मंडळाची भजने. रात्रौ ८ वा.आरती, श्रीरामाची पालखी प्रदक्षिणा व ढोल ताशांच्या गजरात भोवत्या होतील.त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल.तरी सर्वांनी उपस्थित राहून दर्शनाचा व तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर व्यवस्थापनाने केले आहे.










