रत्नागिरी – रत्नागिरी जिल्हा परिषदेचे भूतपूर्व उपाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार श्री. बाळासाहेब पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच रत्नागिरी येथे मौजे नायरी येथील ग्रामस्थांची ‘नायरी मेंबर्स असोसिएशन’ची स्थापना करण्यात आली. संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी नायरी हे ऐतिहासिक गाव असून या गावातील रत्नागिरी येथे स्थायिक झालेल्या नागरिकांची ही नोंदणीकृत संस्था आहे.
संस्थेची नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे १) अध्यक्ष श्री. लायक अली खतीब २) सचिव -श्री. मुराद अली पाटणकर ३) खजिनदार श्री. लियाकत अली खतीब. सदस्य पुढील प्रमाणे – १) श्री. अतिकं पाटणकर २) श्री. शकील मोडक ३) श्री. नियाझ पाटणकर ४) श्री. हसन पाटणकर ५) श्री. अकील डिंगणकर ६) श्री. शाबाद कापडी ७) श्री. मुनव्वर मालीम ८) श्री. असगर काझी.
या संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. विचारवंत, बुध्दीवंत, वैज्ञानिक व कलाकार यांना प्रोत्साहन म्हणून कार्यक्रम घेणे, व्याख्याने, चर्चासत्रे तसेच परिसंवाद आयोजित करणे, क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे, विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन तसेच समाज प्रबोधनाच्या दृष्टीकोनातून सामाजिक चळवळींचे संवर्धन करणे हे या संस्थेचे उद्देश असून त्यानुसार लवकरच कार्यक्रम आयोजित करण्यात येतील असे श्री. अतिक पाटणकर यांनी सांगितले.










