नवयुवक कला क्रीडा मंडळाचे आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी : सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील नवयुवक कला क्रीडा मंडळाच्या वतीने शनिवार २२ मार्च रोजी माऊली माध्यमिक विद्यालय नजीक रात्रौ ९ वाजता अष्टविनायक दशावतार नाट्य मंडळ निरवडे यांचा दशावतार नाट्य प्रयोग आयोजित केला आहे. तर २३ मार्च रोजी रात्रौ ९ वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध डबलबारी बुवा अभिषेक शिरसाट व बुवा समीर कदम यांच्या ट्वेंटी-ट्वेंटी डबलबारी सामन्याचे आयोजन केले आहे. बुवा अभिषेक शिरसाट यांना पखवाज साथ रुपेश परब तर तबला साथ अभिषेक सुतार करणार आहेत. तर गोवा येथील समीर कदम यांना पखवाज साथ ओंकार दुखंडे तर तबला साथ भावेश लाड करणार आहेत. तरी दशावतारी नाट्य रसिक आणि डबलबारी रसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.












