रत्नागिरी : आरोग्य आणि नैसर्गिक स्त्रोतांचे शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी दरवर्षी २२ मार्च हा दिवस “जागतिक जल दिन” म्हणून साजरा केला जातो. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता, शाश्वतता व संवर्धन याबाबत जिल्हयामधील ग्रामस्थापर्यंत पोहचविण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांची सुहास विध्वंस यांनी मुलाखत घेतली. जागतिक जल दिना निमित्त मुलाखत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरुन शनिवार, दि.२२ मार्च, २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता प्रसारीत होणार आहे. सदर मुलाखत आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरुन ११४३ किलो हर्टस् वर १०१.०५ दशांश Mhz या एफ.एम. वाहीनीवर आणि Newsonair या मोबाईल app वर सर्वत्र प्रसारीत होणार आहेत.
सदरच्या मुलाखतीलमध्ये “जागतिक जल दिन” निमित्त पाणी गुणवत्ता, शाश्वतता व पाण्याचे संवर्धन याविषयी माहिती दिली गेलेली असून, जिल्हयामधील सर्व ग्रामस्थांनी ही मुलाखत ऐकावी असे आवाहन रत्नागिरी जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक (पाणी व स्वच्छता) यांनी केले आहे.










