गो सन्मान अभियानांतर्गत लांजा तहसीलदारांना निवेदन
लांजा (प्रतिनिधी) गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यासाठी गो सन्मान अभियानांतर्गत आज सोमवारी लांजातील हिंदू बांधवांच्या वतीने लांजा तहसीलदार प्रियांका ढोले यांना निवेदन सादर करण्यात आले.
संपूर्ण देशभरात आज २७ एप्रिल रोजी गो सन्मान अभियानांतर्गत तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. तहसीलदारांमार्फत देशाचे राष्ट्रपती, राज्यपाल, प्रधानमंत्री ,मुख्यमंत्री यांना हे निवेदन सादर करण्यात आले. गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा, गोमातेचे संरक्षण व्हावे, गोमातेचे संरक्षण होण्यासाठी संशोधन व्हावे, आणि गोपालन होण्यासाठी गोपालन मंत्रालय व्हावे या प्रमुख मागण्यांसाठी हे निवेदन सादर करण्यात आले.
आजकाल अनेकदा आपल्याला गोहत्या च्या बातम्या वाचनात येतात. हिंदू धर्मात गोमाता ही पूजनीय असून 33 कोटी देवांचा त्या ठिकाणी वास आहे. भगवान श्रीकृष्णाचे वर्णन देखील गोपाळ म्हणून केले जाते. अशी ही पूजनीय गोमाता आज रस्ता रस्त्यावर भटकते आहे. म्हणूनच गोमातेचे संरक्षण व्हावे, तिला राजम राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा या अनुषंगाने संपूर्ण देशभरात हे अभियान टप्प्याटप्प्यात राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने आज सोमवारी लांजा तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले . यावेळी लांजा शहरातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.









