अमित साटम यांच्याकडून शिरगाव हायस्कूलच्या वसतिगृहाला वॉटर फिल्टर भेट

शिरगाव (प्रतिनिधी): देवगड तालुक्यातील शिरगाव हायस्कूल मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने मुंबई कार्यकारिणी सदस्य श्री अमित साटम यांनी वॉटर फिल्टर प्रदान केला. रविवार, २३ मार्च २०२५ रोजी शिरगाव हायस्कूलच्या कार्यालयात हा समारंभ पार पडला.संस्थेचे कार्याध्यक्ष पी. व्ही. साटम यांनी वॉटर फिल्टर स्वीकारला.

यावेळी संस्था उपाध्यक्ष संभाजी साटम, राजन चव्हाण, विजय जाधव, कार्यकारिणी सदस्य हेमंत देसाई, राजेंद्र शेट्ये, मानद अधीक्षक संदीप साटम, शिरगाव शाळा समिती चेअरमन विजयकुमार कदम, कुवळे शाळा समिती चेअरमन विजय तावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा लाभ मिळणार आहे. संस्थेच्या वतीने अमित साटम यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.