घोटगेवाडी येथील यशवंत तुळसकर यांची नवोदय विद्यालयासाठी निवड

दोडामार्ग | प्रतिनिधी : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक विद्यामंदिर घोटगेवाडी ता दोडामार्ग या प्रशालेतील विद्यार्थी कु. यशवंत शाबी तुळसकर यांची नवोदय विद्यालयात निवड झाली आहे
यासाठी प्रशालेचे मुख्याध्याक श्री दत्ताराम दळवी वर्गशिक्षक सौ दीक्षा दळवी श्री राठोड, श्री बोरकुटे आदींचे सहकार्य लाभले. त्याचे वडील दोडामार्ग तालुका शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना अध्यक्ष शाबी तुळसकर याचेही अभिनंदन करण्यात येत आहे