खेड (प्रतिनिधी)
चुली समोर शेकोटी घेत असताना भाजून गंभीर जखमी झालेल्या वृद्धेचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. जयश्री घोरपडे (७०, रा. वेरळ-खेड) असे मृत वृद्धेचे नाव आहे. ही वृद्धा ७ मार्च रोजी ‘घरी एकटी असताना चूल पेटवून शेकोटी घेत होती. याचवेळी अंगावरील साडीने पेट घेतल्याने त्या होरपळल्या. तिला उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला.











