अनेक इच्छुकांचे पत्ते कट : १८ ग्रामपंचायतींवर महिलाराज
दोडामार्ग : प्रतिनिधी : तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतींच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीमधील सरपंच पदाचे आरक्षण मंगळवारी जाहीर झाले. यामध्ये तालुक्यातील निम्म्या म्हणजेच १८ ग्रामपंचायतीवर महिलाराज असणार आहे. आरक्षण सोडतीनंतर अनेक गावांमध्ये दिग्गज इच्छुकांचे सरपंच बनण्याचे स्वप्न अधुरे राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीचे आरक्षण प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी जाहीर केले. तहसील कार्यालयाच्या सभागृहात चिट्ठीद्वारे ही सोडत पद्धत पार पडली. यावेळी अनेक गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
आरक्षणाची तपशीलवार माहिती पुढील प्रमाणे :
*नागरिकांचा मागास प्रवर्ग* : कुडासे, घोटगे, तळकट, मोर्ले, वझरे.
*नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)* : कोलझर, खोक्रल, झरेबांबर, पाट्ये पुनर्वसन सासोली खुर्द, आडाळी.
*अनुसूचित जाती (महिला)* : साटेली भेडशी
*अनुसूचित जाती प्रवर्ग* : तेरवण मेढे
*खुला प्रवर्ग* : आंबडगाव, आयी, उसप, कुडासे खुर्द, केर, झरे २, तळेखोल, पिकुळे, फुकेरी, माटणे, मोरगाव, सासोली.
*खुला प्रवर्ग (महिला)*: आयनोडे – हेवाळे, कळणे, कुंब्रल, कोनाळ, घोटगेवाडी, झोळंबे, परमे पणतुर्ली, बोडदे, बोडन, मणेरी, विर्डी.











