देवगड/ प्रतिनिधी
देवगड येथील शेठ म. ग. हायस्कूलच्या निवृत्त शिक्षिका श्रीमती रोहिणी भास्कर आठवले (92) यांचे रविवारी सायंकाळी 4.30 वा. च्या सुमारास प्रदीर्घ आजाराने राहत्या घरी निधन झाले. सायंकाळी उशिरा देवगड येथील वैकुंठ स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
स्वर्गीय ज्येष्ठ साहित्यिक, लेखक आणि संगीतकार डॉ. भा. वा. आठवले यांच्या त्या पत्नी होत. तसेच देवगड लाईफ लाईन फाउंडेशनचे अध्यक्ष, वैद्यकीय व्यावसायिक व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनील आठवले यांच्या त्या आई, डॉ. सौ. मंजुषा आठवले यांच्या त्या सासू, डॉ. तन्मय आठवले यांच्या त्या आजी होतं. पच्छात मुलगा, सून, नातू, नातसून असा परिवार आहे.












