नाचणे येथील नवविवाहितेची आत्महत्या

रत्नागिरी ः प्रतिनिधी : अज्ञात कारणातून विषारी औषध प्राशन केलेल्या नवविवाहितेचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकिय रुणालयात मृत्यू झाला.ही घटना शुक्रवार 26 मे रोजी रात्री 11 वा.घडली.याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सरिता सुमित झोरे (24,मुळ रा.आंबवली,संगमेश्वर सध्या रा.शांतीनगर रसाळवाडी नाचणे,रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या नवविवाहितेचे नाव आहे.गुरुवार 25 मे रोजी सरिताने अज्ञात कारणातून राहत्या घरी कोणतेतरी विषारी औषध प्राशन केले होते.त्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल केले होते.परंतू शुक्रवार 26 मे रोजी रात्री 11 वा.उपचारांदरम्यान तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी सरिताला तपासून मृत घोषित केले.याप्रकरणी अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.