मनसे सरचिटणीस व कोकणातील नेते वैभव खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आज रत्नागिरी तालुकाध्यक्ष पदी सचिन शिंदे यांची तर राजापूर उपजिल्हाध्यक्ष पदी जुनेद बंदरकर यांची वर्णी लावण्यात आली.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पाहता मनसेने रत्नागिरी मधील संघटणा बांधणी अत्यंत गांभीर्याने घेतल्या आहेत. रत्नागिरी व राजापूर तालुका व शहर संघटना बांधणी करिता योग्य व्यक्ती निवडून त्यांची मोट बांधणी करिता सरचिटणीस व कोकणातील मनसे चे नेते वैभव खेडेकर यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
यां निवडी प्रसंगी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश सौन्दळकर उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे उत्तर रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष सचिन गायकवाड रत्नागिरी शहर सचिव प्रभात सुर्वे राजापूर उपजिल्हाध्यक्ष जुनेद बंदरकर इत्यादी उपस्थित होते.











