राजापूर (वार्ताहर): येथील प्रसिध्द उद्योजक आणि हॅपी होम बोअरवेलचे मालक कै. प्रकाश कातकर यांच्या निधनाबद्दल शनिवार दि. ३ मे रोजी सकाळी ९ वाजता राजापूर हायस्कुल कलामंदिर सभागृहात शोक सभेचे आयोजन करण्यात आले.
राजापूर शिक्षण प्रसारक मंडळ, कुणबी समाजोन्नती संघ शाखा राजापूर, राजापूर अर्बन बँक, व्यापारी संघटना राजापूर, राजापूर प्रतिष्ठान व मित्र परिवाराच्या वतीने ही शोकसभा आयोजित करण्यात आली आहे.
या शोकसभेला कै. प्रकाश कातकर मित्र परिवार व हितचिंतकांनी उपस्थीत रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
———————————————————–












