२२ पैकी ११ महाविद्यालयांचा निकाल १०० टक्के
खेड(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी फेब्रुवारी २०२५ मधील इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला असून, खेड तालुक्यातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांनी उल्लेखनीय कामगिरी केली तालुक्याचा निकाल ९४.३२ टक्के इतका लागला आहे यामध्ये ९९३ मुले तर ८८५ मुली असे १८७८ उत्तीर्ण झाले. पास टक्केवारी ९४.३२% इतकी आहे. यामध्ये ११८ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य, तर ३२० विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली आहे.
१००% निकाल प्राप्त करणारी महाविद्यालये: एस.आय. सेकंडरी स्कूल व ज्युनिअर कॉलेज, फुरस (सायन्स) – ४४ पैकी ४४ विद्यार्थी उत्तीर्ण, एम.टी. हजवानी इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज (सायन्स व कॉमर्स) – एकूण ९८ पैकी ९८ विद्यार्थी उत्तीर्ण. , एम.आय.बी. गर्ल्स ज्युनिअर कॉलेज, खेड (सायन्स व कॉमर्स) – ४८ पैकी ४८ विद्यार्थी उत्तीर्ण. , न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, आंबडस (सायन्स) – सर्व ५१ विद्यार्थी उत्तीर्ण., आदर्श हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, करजी, खेड (कॉमर्स) – सर्व ११ विद्यार्थी उत्तीर्ण, यशवंत विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, धामनंद (कॉमर्स) – १४ पैकी १४ विद्यार्थी उत्तीर्ण यांचा समावेश आहे. तर श्रीमान चंदुलालशेठ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेड – सर्वाधिक ४२१ विद्यार्थ्यांपैकी ४१३ विद्यार्थी उत्तीर्ण, ९८.०९% निकाल, नवभारत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, भराणे – ३७५ पैकी ३६१ विद्यार्थी उत्तीर्ण, ९६.२६%, विश्वनाथ विद्या व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, लवेल – १९२ पैकी १७९ विद्यार्थी उत्तीर्ण, ९३.२३%, छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेज – २६ पैकी २५ विद्यार्थी उत्तीर्ण, ९६.१५%, एल.पी. इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेड – ३९ पैकी ३८ विद्यार्थी उत्तीर्ण, ९७.४३%, ज्ञानदीप विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय, भडगाव – सर्व २१९ विद्यार्थी उत्तीर्ण, एस.एम. मुकादम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेड – २० पैकी १७ विद्यार्थी उत्तीर्ण, ८४.६१%, कनिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालय, तळे, – ९ पैकी ७ विद्यार्थी उत्तीर्ण, ७७.७७% निकाल लागला आहे.
हाजी एस एम मुकादम हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज खेड आर्ट्स ९६.६४% कॉमर्स ९८.५१ टक्के एलटीटी ज्युनिअर कॉलेज खेड सायन्स ८७.५० कॉमर्स १००% छत्रपती संभाजी राजे सैनिकी स्कूल जामगे सायन्स १००% आयडियल इंग्लिश सेकंडरी स्कूल व ज्युनियर कॉलेज फुरुस कॉमर्स १००% न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज खवटी आर्टस ८६ २०% कॉमर्स १००% न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आंबवली आर्ट्स १००% कॉमर्स १००% संत तुकाराम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज अनसपुरे सायन्स १००% कॉमर्स १००% एम आय हजवाणी इंग्लिश मीडियम स्कूल जुनियर कॉलेज खेड सायन्स १००% कॉमर्स १००% एमआयबी जुनिअर कॉलेज खेड सायन्स १००% कॉमर्स १००% नारायणराव कदम व ज्युनिअर कॉलेज चिंचघर आर्ट्स ६६.६६% सायन्स १००% श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम अँड ज्युनिअर कॉलेज वेरळ सायन्स ७१.४२% कॉमर्स १००% एस एम ज्युनिअर कॉलेज खेड सायन्स १००%.
खेड तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशामुळे विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन होत असून, हे यश भविष्यातील वाटचालीसाठी मजबूत पायाभूत ठरेल, असे मत शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.










