दापोली आमदारकी ची ‘सुभेदारकी’ नेमकी कोणाला? फैसल्याची घडी अवघ्या एका दिवसावर!

 

देवेंद्र जाधव, खेड
गेला महिनाभर विधानसभा निवडनुकिचे वातावरण गाव,वाडया, वस्ती तांडयावर दिसून येत होते. २० रोजी या निवडणूकिची मतदान प्रक्रिया देखील शांततेत पार पडून मतदानाची आकडेवारी मागिल पंचवार्षिक निवडणूकिच्या ४ टक्क्यांनी म्हणजेच  ६६.९४  टक्के इतके मतदान झालेले आहे. वाढलेली टक्केवारी नेमकी कोणाच्या पथ्यावर  पडणार आणि दापोलीचा नवा “सुभेदार” कोण होणार याकडे आता सर्वमतदारांचे लक्ष्य २३ नोव्हेंबर या निर्णयाक दिवसाकडे लागून राहिले आहे.
तब्बल ६ उमेदवार रिंगणात असलेल्या दापोली मतदार संघ राज्यातील उत्कंठावर्धक वाढवणारा मतदार ठरला आहे. गेल्या महिनाभरात प्रचाराचा उडालेला धुरळा १८ रोजी शांत होवून २० ला मतदार राजाने ६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटी बंद केले आहे. त्याचा  फैसला आज लागणार आहे.
मतदार राजाने नेमका कौल कोणाला दिला? हे चित्र देखील स्पष्ट होणार आहे. या मतदार संघात शिंदे गटाचे शिवेसना नेते रामदास कदम यांचे सुपूत्र योगेश कदम, यांनी केलेली मतदार संघाची बांधणी व त्यांच्या विरोधात उभे असलेले उबाठा गटाचे उमेदवार संजय  कदम यांच्या या दोघांमध्येच खरी लढत रंगली.
परंतु ऐन वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संतोष अबगुल यांचा या मतदार संघात झालेल्या इंट्रीमुळे नेमके आणि कोणाचे नुकसान झाले आहे हे मत मोजणी नंतरच समजणार आहे.
सध्या तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय कदम यांच्या विजयाचे दावे करण्यात येत आहे. मात्र या मतदार संघात झालेले मतदानाची आकडेवारी पाहता स्पष्ट कौल नेमका कोणाला मिळाला आहे हि बाब २३ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल. दापोली विधानसभा संघासाठी दोन्ही पारंपरिक पक्षाकडून मोर्चेबांधणी करण्यात आली होती. त्यामुळे दोन्हीही उमेदवार आपण सेफ असल्याची आहोत असे दिसत आहे. मात्र असे असले तरी मतदानाची टक्केवारी पाहता मतदार राजा देखील संभ्रमात पडला आहे.
यावेळच्या निवडणूकीत चाकरमान्यांनी देखील उत्स्फुर्तपणे खाजगी गाडयांचा आधार घेत मतदार केंद्रापर्यत पोहचून आपला मतदानाचा हक्क बजावला असून काहीशी टक्केवारी देखील वाढलेली दिसून येत आहे.
मागील निवडणूकीत सेनेच्या अंतर्गत बंडाळीचा फायदा राष्ट्रवादी  कॉग्रेसला मिळाल्याने दापोली विधानसभेवर आमदार संजय कदम यांनी आमदारकीची सुभेदारी मिळवलेली होती. मात्र या निवडणूकित सेनेकडून योगेश कदमांनी केलेली नव्याने बांधणी व ३५०० कोटींचा विकास या मुद्दा यामुळे त्यांचा विजय देखील पक्का मानला जात आहे.
या निवडणुकीच्या मतदानाचा टक्का अखेरच्या म्हणजेच संध्याकाळच्या सत्रात वाढला त्यामुळे जवळपास ६७ टक्के पर्यत मतदानाचा आकडा वाढलेला दिसुन आला. मतदानाच्या अखेरच्या सत्रात झालेले मतदान हे लक्षवेधी ठरले असून या टक्केवारीचा फायदा नेमका कोणाला  होणार ? याचा फैसला आजच्या निर्णायक तारखेला होणार आहे.
६ उमेदवार असलेल्या दापोली मतदार संघात खरी लढत योगेश कदम विरूध्द संजय कदम अशीच होती. उर्वरित ४ उमेदवारांनी या दोन पारंपारिक पक्षाचे किती नुकसान करत नेमके किती मतदान मिळवले हा देखील विषय उत्सुकतेचा ठरणार आहे. त्यामुळे २३ रोजी नेमके काय होणार याच्या फैसल्याची घडी अवघ्या एका दिवसावर येवून ठेपली आहे.