आचरा–अर्जुन बापर्डेकर : ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी चे दहावीपरीक्षेत प्रविष्ठ सर्वच्या सर्व १७विद्यार्थी पास होत सलग नवव्या वर्षी शंभर टक्के यशाची परंपरा कायम ठेवत उज्वल यश संपादन केले.या परीक्षेत
मंजिरी पुरुषोत्तम घाडीगांवकर हिने ९४टक्टे गुण मिळवून प्रशालेतून प्रथम येण्याचा मान मिळविला.प्रशालेतून द्वितीय सेजल सत्यवान केळूस्कर हिने
८८.२०तर
आकांक्षा मंगेश तोंडवळकर ८६.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष सदा राणे,सचिव वैभव जोशी,खजिनदार समृद्धी आसोलकर,सर्व संस्थाचालक, मुख्याध्यापक टकले सर,सर्व शिक्षक पालकआदींनी अभिनंदन केले आहे.










