सिद्धी उद्योग केंद्र यांच्यावतीने शिरगावात १८ मे रोजी शैक्षणिक करिअर मार्गदर्शन शिबीर

चिपळूण (प्रतिनिधी) : सिद्धी उद्योग केंद्र यांच्यावतीने विद्यार्थी वर्ग यांच्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे याच उद्देशाने दि १८ मे रोजी सायंकाळी ४ ते ८ या वेळेत श्री स्वामी समर्थ मंगलकार्यलय ब्राह्मणवाडी शिरगाव येथे मोफत शैक्षणिक व करिअर सेमिनार आयोजित करण्यात आले आहे.

या सेमिनारमध्ये माजी मुख्याध्यापक भास्कर कदम ज्यांना चाळीस हून अधिक वर्षांचा अनुभव असून, ते माजी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. तसेच ग्रामीण भागात राहून संघर्ष करून स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणाऱ्या निवडक व्यक्तींचे मार्गदर्शन देखील लाभणार आहे. तसेच शैक्षणिक कर्ज संदर्भात बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर श्री. कदम हे देखील उपस्थित राहणार आहेत. तरी सदरच्या सेमिनारला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन प्रसन्न आडविलकर यांनी केले आहे.