भाजपा जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी घेतली प्रदेशाध्यक्ष आ.रवींद्र चव्हाण यांची भेट

चिपळूण (प्रतिनिधी) : भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस आणि मंडल अध्यक्ष यांची संघटनात्मक विषयावर चर्चा विनिमय करण्यासाठी रायगड बंगला, नरीमन पॉईंट, मुंबई येथे बैठकीचे आयोजन केले होते.
यावेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे, वसंत ताम्हणकर, अक्षय फाटक, खेड दक्षिण मंडल अध्यक्ष विनोद चाळके, गुहागर मंडल अध्यक्ष अभय भाटकर, चिपळूण ग्रामीण पश्चिम मंडल अध्यक्ष उदय घाग, खेड उत्तर मंडल अध्यक्ष ऋषिकेश मोरे, मंडणगड अध्यक्ष प्रवीण कदम, दापोली शहर मंडल अध्यक्षा जया साळवी, दापोली ग्रामीण मंडल अध्यक्ष सचिन होडबे, खेड शहराध्यक्ष अनिकेत कानडे आदी उपस्थित होते.