मालवण | प्रतिनिधी : तळकोकणात पावसात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे मोठया समस्या नागरिक व व्यवसायिक यांना निर्माण होतात. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केले.
कोकणात पाऊस हा महत्वाचा निकष आहे. विद्युत यंत्रणा अनेक वर्षपासून फक्त दुरुस्तीवर अवलंबून आहे. जोपर्यंत आपण वादळ, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस आणि सरासरी चार हजार मिलिमिटर पाऊस हिशोबात घेत नाही, तोपर्यंत तळकोकणात ही विद्युत यंत्रणा अशीच निकामी ठरणार आहे. यावर तोडगा काढण्यासाठी लवकरच या विषयावर मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केले आहे.












