मंडणगड l प्रतिनिधी – जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मंडणगड नगरपंचायतीच्यावतीने नगरपंचायत कार्यक्षेत्रात विविध पर्यावरण पुरक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायत अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, नागरिक विविध ठिकाणी आयोजीत उपक्रमात मोठ्या उत्साहात सहभागी झाले. जागतिक पर्यावरण दिवस व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत घनकचरा प्रकल्प केंद्र कोंझर येथे वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा अभियान हरित शपथ व जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन अंतर्गत स्वच्छ भारत, हरित भारत- हरित प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच विविध ठिकाणी प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती साठी कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. या उपक्रमाचा उद्देश पर्यावरण संवर्धनास चालना देणे आणि प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करून हरित जीवनाचा मार्ग अवलंबवने हा आहे. या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनासाठी महिलांचा सक्रिय सहभाग वाढवण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्याधिकारी श्री. अभिजीत कुंभार यांनी या निमीत्ताने व्यक्त केला आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपप्रादेशिक कार्यालय चिपळूण यांच्यावतीने नगरपंचायत सभागृहात आयोजीत कार्यक्रमात पर्यावरण जनजागृतीसह नागरिकांना कापडी पिशव्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात नगराध्यक्षा सोनले बेर्डे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, विरोधी पक्ष गटनेता विनोद जाधव, सुभाष सापटे, आदेश मर्चंडे, निलेश सापटे नगरसेविका वैशाली रेगे, प्रमिला किंजळे, प्रियंका लेंडे, राजेश्री सापटे, समृध्दी शिगवण, मनिषा हातमकर हरेष मर्चंडे, सेजल गोवळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. दळवी, लेखापाल श्री. करांडे, कर्मचारी मनोज मर्चंडे, विकास साळवी, संदीप डीके, रोशन बेलोसे, अभिजीत सालेकर, सुरज कदम, गणेश सापटे, समिर साळवी, चंद्रकांत तलार, स्नेहा सापटे, नेहा गोरीवले, प्रमोद मर्चंडे, संतोष सापटे, समिर सापटे, प्रकाश साळवी यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.










