सीएसएमटी-मडगाव एकेरी स्पेशलचे आरक्षण खुले

खेड(प्रतिनिधी)कोकण मार्गावर १४ जून रोजी चालवण्यात येणाऱ्या सीएसएमटी मुंबई-मडगाव एकेरी स्पेशलचे आरक्षण शनिवारपासून खुले झाल्याने पर्यटकांना दिलासा मिळाला आहे.

 

कोकणासह गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांची रेल्वेगाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी

करण्यासाठी ०११७१ क्रमांकाची सीएसएमटी-मडगाव एकेरी स्पेशल चालवण्यात येणार आहे.

 

सकाळी ७.३५ वाजता मुंबईतील सीएसएमटी स्थानकातून सुटणारी स्पेशल त्याचदिवशी रात्री १०.३० वाजता मडगाव येथे पोहोचेल. या स्पेशलला १६ एलएचबी डबे जोडण्यात येणार असल्याचे कोकण रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.