महिला पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल; भरणे ग्रामपंचायत विभागात राजकीय घडामोडींना वेग
खेड (प्रतिनिधी) : भरणे ग्रामपंचायत विभागात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित पक्षप्रवेश सोहळ्यात विविध राजकीय पक्षांतील पदाधिकारी, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, कार्यकर्ते आणि महिलांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. भाजप नेते तथा खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनसेवेवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत नव्या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केल्याचे भाजपच्या वतीने सांगण्यात आले.
भाजपचे बूथ अध्यक्ष साईराज पवार आणि भाजप कार्यकर्ते संतोष यादव यांच्या माध्यमातून या पक्षप्रवेशाचे आयोजन करण्यात आले होते. रुपेश काते, भिकू शिगवण, चंद्रशेखर हेळगावकर, राजाराम लाड, उदय पांढरे, सूरज लाड, सुमित पाटील, अथर्व काते, रुपेश जाधव, राजू मांडवकर आणि नितीन डांगरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत अनिता शिगवण, हेमलता यादव, वैशाली काते, धनश्री काते, स्वरूपा खेडेकर, रिया महागावकर, शिवकन्या बांगर, सुमन शेले, योगिता बांगर आणि रामचंद्र डांगरे यांनीही पक्षात प्रवेश केला.
वैभव खेडेकर यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची भूमिका नव्याने पक्षात दाखल झालेल्यांनी व्यक्त केल्याचे पक्षाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. विविध पक्षांतील कार्यकर्त्यांसह महिलांचाही या पक्षप्रवेशात सहभाग असल्याने भरणे विभागातील राजकीय हालचालींकडे लक्ष वेधले गेले आहे.
या सोहळ्याला भाजप युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सचिव मिलिंद नांदगावकर, भाजप तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, गटनेते तथा नगरसेवक रहीम साहिबोले, भाजप शहराध्यक्ष भालचंद्र ऊर्फ नंदू साळवी, वाहतूक सेलचे तालुकाध्यक्ष सुयश खेडेकर, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विशाल होळकर, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष स्वराज गांधी, शक्तिकेंद्रप्रमुख वैजेश सागवेकर, प्रथमेश सुर्वे, अनिकेत पवार, भाजप सरचिटणीस विजय गुप्ता, माजी नगरसेवक संदेश भुवड आणि अविराज मोरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खेड तालुक्यात पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी भाजपकडून स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू असताना भरणे ग्रामपंचायत विभागातील हा पक्षप्रवेश सोहळा चर्चेचा विषय ठरला आहे. नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आगामी काळात स्थानिक पातळीवर पक्षाचे संघटन अधिक सक्रिय करण्यावर भाजपचा भर राहणार असल्याचे या घडामोडीतून स्पष्ट होत आहे.













