गौरव पोंक्षे l माखजन : समाजात परिवर्तन व्हावे असे वाटत असेल तर शिक्षकांचे विचार समृद्ध असायला हवेत.शिक्षकानी असा विचार करा की,तुमच्या विचारावर दुसऱ्याने विचार करायला हवा असे मत सुलभक अनंत जाधव यांनी व्यक्त केले.
ते रत्नागिरी येथे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे तर्फे,जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांक्सचे मार्फत सुरू असलेल्या वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना बोलत होते.
अनंत जाधव पुढे म्हणाले की,समाजातील प्रत्येक व्यक्ती ही शाळेतून संस्कार घेऊन जात असते.त्यामुळे शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे.शाळा शाळांमध्ये उत्तम संस्कार झाले तरच समाजात जाणारा प्रत्येक विद्यार्थी हा चारित्र्य संपन्न असतील.असे नमूद केले.
अनंत जाधव यांनी उच्च माध्यमिक व माध्यमिक गटातील शिक्षकांना हसत खेळत शिक्षण कस असावं याचे विविध दाखले देत उदाहरण दिले.
दरम्यान या प्रशिक्षणात सागर पोकळे,प्रभात कोकजे,सौ मानसी गानू,सुधीर शिंदे,दिगंबर घवाळी,मोहन बापट सौ विभा बाणे,सौ वर्षा घाग आदी मार्गदर्शन करत आहेत.
तर हे प्रशिक्षण डाएट चे प्राचार्य सुशीलकुमार शिवलकर,राहुल बर्वे,राजेंद्र लठ्ठे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.तर सौ अश्विनी काणे साधन व्यक्ती म्हणून काम पाहत आहेत.










