महामार्गावरील कळंबणी नजीक रस्ता खचला 

खेड(प्रतिनिधी) मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणी वाळंज वाडी नजीकचा रस्ता खचल्याची घटना घडली आहे. वाळंजवाडी येथील ओढ्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूला काँक्रीटला मोठे तडे गेले असून रस्ता खचायला सुरुवात झाली आहे. त्या मुळे हा महामार्ग धोक्याचा बनला आहे

 

वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाल्यामुळे रस्ता तात्काळ बंद करण्याची गरज निर्माण झाली आहे. स्थानिकांनी खबरदारी म्हणून महामार्गावर झाडाच्या फांद्या टाकल्या आहेत. ही घटना तीन-चार दिवसांपूर्वी घडली असली तरी सोमवारी रात्रीपासून परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. कळबनी बुद्रुक हद्दीमध्ये वाळंजवाडी येथे हायवेच्या पुलाच्या दोन्ही बाजूने तडे, पुल धोकादायक बनला आहे हायवेवर वाहतूक ठप्प होण्याची भीती येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.