शिरगावमध्ये मनसेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळाही संपन्न
शिरगाव (प्रतिनिधी) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून तळागाळातील जनतेला न्याय मिळावा यासाठी मनसे कटिबद्ध आहे. मनसैनिक सामान्यांची कामे मार्गी लावण्यासाठी सदैव तत्पर राहतील, असे प्रतिपादन सरचिटणीस संदीप दळवी यांनी शिरगाव येथे व्यक्त केले.
रविवारी देवगड तालुक्यातील शिरगाव येथे संदीप दळवी यांच्या हस्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी त्यानी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांनी मनसे कार्यकर्ते या पुर्वी चौकात उभे राहून जनतेचे प्रश्न सोडवत असत. आता हक्काचे कार्यालय मिळाल्याने काम अधिक परिणामकारक होईल.तसेच देवगड आणि कणकवली येथेही लवकरच अशी कार्यालये सुरू करण्यात येतील,असे सांगितले.
यावेळी दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचाही गुणगौरव करण्यात आला
या उद्घाटन सोहळ्याला मनसे जिल्हा संपर्कप्रमुख संतोष शिंगाडे, देवगड तालुका संपर्क अध्यक्ष नितीन पवार, जिल्हाध्यक्ष धीरज परब, अनिल केसरकर, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर, चंदन मेस्त्री, कुणाल किनळेकर, जिल्हासचिव सचिन तावडे, देवगड सहसंपर्क अध्यक्ष सुरेंद्र गावडे, तालुकाध्यक्ष रुपेश पांगम, वैभववाडी तालुकाध्यक्ष महेश कदम, शाखाध्यक्ष राजन पवार, भाई पांगम, सुनील गुरव तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.











