दापोली l प्रतिनिधी:-दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित ए. जी. हायस्कूल व जुनिअर कॉलेज दापोली या संस्थेमध्ये नुकतीच उपमुख्याध्यापक पदी अर्जुन घुले यांची नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी संस्थेचे चेअरमन डॉ. प्रसाद करमरकर, सचिव श्री. विनोद जोशी आणि संस्था संचालक श्री. समीर गांधी. उपस्थित होते.
श्री.अर्जुन गणपत घुले यांचे शिक्षण एम.ए.बी.पी.एड.
जून 1995 पासून दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीराम हायस्कूल हर्णे-पाज,या प्रशालेत एकूण 23 वर्षे सहाय्यक शिक्षक म्हणून काम केले. ऑक्टोबर 2018 पासून ए.जी.हायस्कूल दापोली येथे सहाय्यक शिक्षक म्हणून 7 वर्षे काम केलं. एप्रिल 2025 पासून ए.जी.हायस्कूल येथे पर्यवेक्षक म्हणून 2 महिने काम आणि जून 2025 पासून उपमुख्याध्यापक म्हणून सेवेत कार्यरत. इयत्ता 9वी व 10 वी या वर्गांना इंग्लिश विषयाचे अध्यापन,क्रीडा विभाग उत्तम प्रकारे सांभाळून खेळाडू राज्य पातळीपर्यंत सहभागी केले. दापोली तालुका महाराष्ट्र छात्रसेना शिक्षक संघटनेचे सचिव म्हणून 8 वर्षे काम करून अध्यक्ष म्हणून 7 वर्षे काम केले. तसेच दापोली तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष म्हणून आता कार्यरत आहेत.
या प्रकारे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटविला आहे त्यामुळे या संस्थेने त्यांना उपमुख्याध्यापक पदी कारभार सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे.













