रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरानजिकच्या पेठ किल्ला येथे झारखंडमधील कामगाराने राहत्या घरी अज्ञात कारणातून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवार 17 जून रोजी दुपारी 12.15 वा. सुमारास उघडकीस आली.
अरमानकुमार नरेश तुरी (20,मूळ रा. झारखंड सध्या रा. पेठ किल्ला, रत्नागिरी ) अरमानकुमार हा करुण्य कंपनीमध्ये कामाला होता. मंगळवारी दुपारी त्याने राहत्या घराच्या बाराला अज्ञात कारणातून गळफास घेतला. ही बाब शहर पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे











