राजापूर (वार्ताहर): येथील नगर वाचनालय राजापूर या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार २९ जून रोजी सकाळी १० वाजता नगर वाचनालय राजापूर येथे आयोजित करण्यात आली आहे.
या सभेत मागिल सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, सन २०२४-२५ या वर्षाचा अहवाल वाचून कायम करणे, सन २०२४-२५ या वर्षात अंदाजापेक्षा जास्त झालेल्या खर्चाला मंजूरी देणे, सन २०२५-२६ करिता लेखापालाची निवड करणे, सन २०२५-२६ करिता सादर केलेल्या अंदाजपत्रकाला मंजुरी देणे, सन सन २०२५-२६ करिता कार्यालयीन सुटया मंजूर करणे आदी विविध विषयांवर सभेत चर्चा होणार आहे.
तरी या सभेला सर्व वर्गणीदार सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष प्रभात पाध्ये, उपाध्यक्ष शेखरकुमार अहिरे, कार्यवाह जयंत अभ्यंकर यांनी केले आहे.












