नविन केंद्र सुरू करण्याची अजिम जैतापकर यांची मागणी
राजापूर (वार्ताहर): सर्वांना आधार कार्ड सक्तीचे केल्यानंतर होत असलेली गर्दी लक्षात घेता जनतेची गैरसोय टाळण्यासाठी राजापूर शहरामध्ये आणखी एक आधारकेंद्र सुरु करावे अशा मागणीचे निवेदन कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष अझीम जैतापकर यांनी राजापूरचे तहसीलदार विकास गंबरे यांना दिले आहे.
राजापूर शहरात सध्या एकच आधारकेंद्र कार्यान्वित आहे. शासनाने आधारकार्ड बाबत सक्ती केली असून आधारकार्ड वरील नाव, जन्म तारीख नोंद, पत्ता, दुरुस्ती करणे आधारकार्ड अपडेट करणे यासाठी या एकमेव केंद्रावर कायम गर्दी असते. जनतेच्या रांगा लागलेल्या असतात.या चा सारासार विचार करून शहरात आणखी एक आधार केंद्राची असलेली आवश्यकता लक्षात घेऊन तात्काळ त्याला मान्यता देवून ते सुरु करावे अशी आग्रहाची मागणी कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष अझीम जैतापकर यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.
——————————————————-











