नामदार श्री. नितेश राणे यांचा 23 जून रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण विधानसभेत विविध सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून किंजवडे जिल्हा परिषद विभागात भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री संदीप साटम आणि विभागीय अध्यक्ष ओमकार खाजनवाडकर यांच्या सहकार्याने आणि हिंजवडी जिल्हा परिषद गट यांच्या वतीने वायरमन यांना मोफत रेनकोट वाटप करण्यात आले. तसेच विविध जिल्हा परिषद शाळांमध्ये 1600 वह्या पेन असे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस संदीप साटम माजी जिल्हा परिषद सदस्य मनस्वी घारे, विभागीय अध्यक्ष ओंकार खाजनवाडकर, दशरथ लोके, रवींद्र ठुकरूल, गुरु घाडी, संतोष करंगुटकर, योगेश परब, रोहित कोठारकर, रावजी खाजनवाडकर, सचिन नाचनकर
मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि वायरमन कर्मचारी उपस्थित होते.













