पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम
वैभववाडी | प्रतिनिधी :सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी भाजपा उपाध्यक्ष हूसेन लांजेकर यांच्या वतीने वैभववाडी तालुक्यात १००० छत्र्यांचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील माध्यमिक व प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांना तसेच गरीब, गरजू ग्रामस्थांना मोफत छत्री वाटप केल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. वेंगसर, मांगवली, मानेवाडी, कोळपे तसेच तालुक्यातील असंख्य गावात हुसेन लांजेकर यांनी स्वतः उपस्थित राहून छत्रीचे वाटप केले.
हुसेन लांजेकर हे मंत्री नितेश राणे यांचे कट्टर समर्थक आहेत. वैभववाडी भाजपा उपाध्यक्ष पदावर ते कार्यरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्षपदी त्यांनी चांगले काम केले आहे. कोळपे गावात त्यांनी उपसरपंच पद, तंटामुक्ती अध्यक्ष पद भूषवली आहेत. यापूर्वी देखील हुसेन लांजेकर यांनी गरीब कुटुंबातील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे. त्यांच्या या दातृत्वाबद्दल प्रशालेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.













