सावंतवाडी – विश्व डान्स अकॅडमी, सावंतवाडी येथे एप्रिल-मे 2025 या सत्रात पार पडलेल्या भरतनाट्यम परीक्षेत प्रारंभिक, प्रवेशिका प्रथम आणि प्रवेशिका पूर्ण या तीन स्तरांतील सर्व विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम श्रेणीत यश संपादन केले आहे.

या परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे श्री गुरू तुळशीदास आर्लेकर सर यांनी विशेष कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या मेहनत, शिस्त, आणि नृत्यकलेतील समर्पण याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि संपूर्ण अकॅडमीचे अभिनंदन करण्यात येत आहे.सांस्कृतिक क्षेत्रात योगदान देणारी ही अकॅडमी भविष्यात आणखी कलावंत घडवेल, असा विश्वास नृत्यप्रेमींनी व्यक्त केला आहे.













