गावखडी श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम आयोजन

गावखडी /वार्ताहर रत्नागिरी तालुक्यातील गावखडी श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेनिमित्त यावर्षी ही मठामधे गुरूवार दिनांक – १०/०७/२०२५ रोजी *”गुरूपौर्णिमा उत्सव”* मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने साजरा करण्यात येणार आहे. तसेच
सकाळी- श्री गुरूदेव हस्ते श्री स्वामी समर्थ पूजन,श्री स्वामी चरणांवर अभिषेक,श्री गुरूचरणांचे पूजन, भक्तगणांचे भक्तीभावाचे प्रतिपादन,दुपारी- श्री गुरूदेवांचे मार्गदर्शन,महानैवेद्य अर्पण व महाआरती,महाप्रसाद वाटप,श्री गुरूदेव चरण दर्शन, व सायंकाळी- ६ -३० वाजता मठामधे *दिपोत्सव सोहळा* इत्यादी कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
*दिपोत्सव – प्रपंचामधे येणाऱ्या अडचणी दूर होऊन,अंधार रूपी दु:ख – दारिद्र्य यांचा नाश होऊन आपल्या जीवनामधे सुख, समृद्धी शांती नांदून आपले जीवन पूर्णत: प्रकाशमय होण्यासाठी प्रत्येक स्वामीभक्ताने किमान एक दिवा किंवा अधिक दिवे दिपोत्सवासाठी मठामधे आपले नाव देऊन प्रज्वलीत करावेत. एका दिव्यासाठी सेवा मुल्य १० रू. आहे.* तरी भक्तगणांनी मठामधे उपस्थित राहून श्री स्वामीदेवांची व सद्गुरूंची कृपा प्राप्त करून घ्यावी
या कार्यक्रमाचा लाभ घ्या असे आवाहन करण्यात आले आहे