Selection of Datta More as Head of Puntargaon Mumbai and Subhash Sakpal as Head of Department
चिपळूण | प्रतिनिधी : शिवसेना गटनेते व मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे नेते व माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या आशिर्वादाने शिवसेनेच्या पंधरागाव विभाग मुंबई संपर्कप्रमुखपदी धामणंद गावचे सुपूत्र व सामाजिक कार्यकर्ते दत्ता मोरे व विभागीय विभाग प्रमुखपदी सुभाष सकपाळ, प्रभाकर पालांडे यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल तालुकाप्रमुख अरविंद चव्हाण यांच्यासह पंधरागाव विभागातील शिवसैनिक ग्रामस्थांनी या दोघांवर अभिनंदनचा वर्षाव केला आहे.
यावेळी शिवसेना संघटनात्मक बांधणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यामध्ये जिल्हा परिषद गटाच्या बांधणीकरिता व मंजुर झालेली विकासात्मक कामे पूर्ण करुन घेणे व संघटना बांधणीकरिता गावनिहाय प्रतिनिधींची कोअर कमिटी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच संघटनेच्या पुढील वाटचालीकरिता योजना आखाव्यात व गाव वाडीतील प्रत्येक घरापर्यंत संपर्क ठेऊन त्यांची कामे पुर्ण करुन घेण्याकरीता सर्वांनी कार्यरत राहण्याचे आदेश देण्यात आले. या बैठकीला पंधरागावातील मनोहर सकपाळ, अनंतराव पालांडे, प्रताप उतेकर, भास्कर पालांडे, ॲड.प्रवीण शिंदे, महेश म्हापदी, अभिषेक म्हापदी, संजय उतेकर, राम उतेकर, सागर सकपाळ, सुयोग उतेकर,चंद्रकांत ऊतेकर,शैलेश उतेकर आदी व युवा कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या पंधरावर्षातील अपूर्ण राहिलेले स्वप्न आणि पंधरागावचा सर्वांगीण विकास रस्ते व पाणी, उद्योग, लघु उद्योग, पर्यटन, आधुनिक शेती, शैक्षणिक प्रगती व महीला बालविकास सह सर्व गोष्टींवर काम करुन मुबलक निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही नेते रामदास कदम यांनी दिली आहे. तसेच पंधरागावात उद्योग उभे करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे आमदार योगेश कदम यांच्या माध्यमातून तरूणांना उद्योग उभारण्यासाठी व मदत करण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. तरी फक्त भावनिक राजकारण न करता विकासात्मक गोष्टींकरीता तरुणांनी पुढे येणे गरजेचे आहे, असे आवाहन देखील करण्यात आले.











