चिपळूण (प्रतिनिधी) : कापसाळ चिपळूण येथील स्वर्गीय आमदार रमेश मोरे प्रतिष्ठान यांच्या वतीने नुकताच वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतिश मोरे, उपाध्यक्ष प्रदिप साळवी तसेच सचिव अॅड. विश्वजीत मनोहर यादव, उद्योजक प्रमोद गोपाळ, देवेंद्र दिपक मोरे, कामथे येथिल सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्य नाना महाडीक, विलास उदेग, स्वर्गीय आमदार रमेश मोरे यांचे मोठे पुतणे श्री. संदिप मोरे सामाजिक कार्यकर्ते परेश मोरे, साई ऑटोचे मालक मंदार साळवी आणि सतिश मोरे यांचे स्वीय सहाय्यक समर्थ कुलकर्णी इत्यादी सदस्य उपस्थित होते.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व स्वर्गीय आमदार रमेश मोरे यांचे पुतणे सतिश मोरे यांनी १५ जुलै रोजी होणाऱ्या संस्थेच्या वर्धापन दिनापर्यंत १००० वृक्षारोपण करण्याचा निश्चय केला. तसेच अॅड. विश्वजीत मनोहर यादव यांनी बोलताना आपण समाजाचे काही देणे लागतो तसेच पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्याकरीता जास्तीत जास्त वृक्ष लागवड होणे काळाची गरज असण्याबाबतचे मत अॅड. विश्वजीत यादव यांनी व्यक्त केले.












