प्रा. सौ .मानसी मंगेश चव्हाण राज्यस्तरीय’शिक्षणरत्न’पुरस्काराने सन्मानित.     

गौरव पोंक्षे l माखजन :रत्नागिरी येथील पटवर्धन हायस्कूल व विजू नाटेकर कला,कै.सौ.विजयालक्ष्मी (गोदूताई) श्रीकृष्ण (नाना) गांधी वाणिज्य व श्रीमान रमेशजी कीर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरीमध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून गेली पंधरा वर्षे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत आहेत.नुकताच २०२५ चा ‘कोकण दीप राज्यस्तरीय शिक्षणरत्न ‘पुरस्कार राज्यमंत्री ना.सन्मानीय योगेशदादा कदम यांच्या हस्ते, प्रा.सुरेंद्र गावस्कर सभागृह, दादर, मुंबई याठिकाणी वितरित करण्यात आला.शालेय जीवनात आदर्श विद्यार्थी पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर शिक्षकी पेशात अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. कै. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा प्रथम पारितोषिक, कै.प्र के अत्रे वैचारिक लेख स्पर्धा राज्यस्तरीय द्वितीय पारितोषिक, लांजा वरिष्ठ महाविद्यालय, रत्नागिरी राज्यस्तरीय कवितालेखन प्रथम पारितोषिक , रत्नागिरी नगरपरिषद आयोजित लो.टिळक निबंध लेखन स्पर्धा गेली अनेक वर्षे प्रथम पारितोषिक,प्रश्नमंजुषा, समय सूचकता, कथाकथन,सुंदर हस्ताक्षर, वक्तृत्व स्पर्धा , वादविवाद स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिके प्राप्त झाली आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर साहित्य क्षेत्रात अनेक प्रबंध प्रकाशित झाले आहेत . जिल्ह्याची अनेक शैक्षणिक प्रशिक्षणे त्यांनी घेतली आहेत .शैक्षणिक उपक्रमात नेहमीच सक्रिय सहभाग दर्शवण्यात आला आहे. यूट्यूब वाहिनीवर अनेक तासिका उपलब्ध आहेत. 2017 चा ‘पर्यावरण मित्र पुरस्कार’, 2023 चा ‘कर्तबगार महिला पुरस्कार’, 2024 विशेष शैक्षणिक साहित्य निर्मिती पुरस्कार ,भूकंपग्रस्त शेतकरी बांधवांना मदत मिळवून देण्यासाठी ‘सामाजिक कार्यकर्ती ‘म्हणून पुरस्कार प्राप्त झाले आहेत .आजपर्यंत 3५० हून अधिक प्रमाणपत्रे त्यांना प्राप्त झाली आहेत. अनेक स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून काम केले आहे. अध्यापन कार्यात अतिशय उत्तम अध्यापन कार्य त्यांच्या हातून घडते आहे.अनेक विद्यार्थी घडविण्याचे काम त्यांच्या हातून होत आहे.विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून आजही सन्मानाने त्यांचा उल्लेख केला जातो.मराठी भाषेबद्दल विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करण्याचे कार्य त्या करत आहेत.त्या उच्च विद्याविभूषित असून सन २०२२मध्ये मराठी विषयात कोल्हापूर बोर्डात प्रथम येण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.इयत्ता १२वी अर्जुन रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात प्रथम,बी.ए मध्ये कै.आनंदी रावराणे वरिष्ठ महाविद्यालयात प्रथम,शासकीय अध्यापक विद्यालय, रत्नागिरी मध्ये २०११साली त्या प्रथम, महर्षी कर्वे शिरगाव महाविद्यालयात डी.एस.एम प्रथम,एम.ए (मराठी),एम.ए (इतिहास ),एम.ए (हिंदी),एम.ए(अर्थशास्त्र),एम.एड् विशेष प्राविण्य,सेट(मराठी)२०१८,एम फील लेखी उत्तीर्ण,लाॅ २०२५ उत्तीर्ण इत्यादी अनेक पदव्या त्यांनी मिळवल्या आहेत.विविध व्याख्याने व मार्गदर्शनपर कार्यक्रमात आपल्या विचारांनी समाज घडविण्यासाठी कार्य त्या करत आहेत.समाजातील हे खरेच ‘शिक्षणरत्न’आहे.त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा व सलाम.